Login

"काय माझा गुन्हा...?" भाग ३७

सामाजिक
दिर्घ कथा लेखन स्पर्धा...
डिसेंबर व जानेवारी...२०२५-२०२६


"काय माझा गुन्हा...?" भाग ३७



"आई…” गौरवी लगेच बोलते,
“माझं एका मुलावर प्रेम आहे... आणि त्याच सुद्धा माझ्यावर खुप प्रेम आहे... तसेच त्याच्या घरुन लग्नासाठी परवानगी सुद्धा मिळाली आहे... आणि तो मला मागणी घालण्यासाठी येणार आहेत... त्याच्या आईसोबत... आणि ते लग्नाची बोलणी करण्यासाठी येणार आहेत... म्हणजेच माझ्या लग्नाचीच बोलणी झाली ना... त्यामुळे मी तसं बोलले...  आणि आईबाबा तुम्ही काळजी करू नका... माझं शिक्षण थांबणार नाही…
मी माझं स्वप्न सोडणार नाही… आणि मी ज्याच्यासोबत ते स्वप्न पूर्ण करणार आहे... तो उद्या इथे येणार आहे…”

वडील थोडे गंभीर होतात…
“कोण आहे तो मुलगा…?
काय करतो…?
आपल्या ओळखीचा आहे का…?”

गौरवी खोल श्वास घेते… आणि पहिल्यांदाच निर्धाराने म्हणते…
“नाही बाबा… तो आपल्या ओळखीमधला नाही आहे... पण
तो मला ओळखतो, समजतो… आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे तो माझ्या स्वाभिमानाला हात लावत नाही…”

"अगं पण तुला आत्ता कुठे अठरा वर्षे पूर्ण झाली आहेत... आणि तुझं काय लग्न लग्न सुरू आहे...? लाज नाही वाटत का तुला... शिक्षण घ्यायचे..., स्वतःच्या पायावर उभे राहायचं... स्वतःचे भविष्य सेक्युर करायचं सोडून... मुर्खासारखे काय लग्न लग्न सुरू केलेस...? आणि प्रत्येक मुलीचे लग्नाचे  वय झाल्यावर लग्न हे होतंच म्हण किंवा करावं लागतंच... पण आता कुठे तुला अजून अठरा वर्षे पूर्ण झाली नाहीत... तर तुझं हे लग्नाचं पालुपद लावून ठेवले आहे...?"  गौरवीची आई...

आईचे शब्द धारदार असतात…
पण त्या शब्दांआड भीती, समाजाची भीड आणि मुलीबद्दलची काळजी दडलेली असते…

गौरवी काही क्षण शांत उभी राहते… तीचे डोळे खाली जमिनीवर असतात… तर दोन्ही हात घट्ट एकमेकांत गुंफलेले असतात…
मग ती हळूच डोकं डोळे वर करते… आणि बोलू लागते...  तीचा आवाज थरथरत नाही, पण दुखावलेला असतो…
“आई… लाज वाटतेय मला… पण प्रेम केल्याची नाही…”

आई चकित होऊन तीच्याकडे पाहते…

“मला लाज वाटतेय… की आजही मुलीने मनातलं सांगितलं
तर तिला चुकीचं ठरवलं जातं…” गौरवी

आई काही बोलणार, तोच वडील मध्येच थांबवतात…
“गौरवी… शांतपणे बोल… तुझं म्हणणं ऐकतो आहोत आम्ही…”

गौरवी एक पाऊल पुढे येते…
“बाबा… मी लग्नाची घाई करत नाहीये… मी आयुष्याची जबाबदारी समजून उमजून बोलतेय…”

ती आईकडे पाहते…
“आई… मी शिक्षण सोडणार नाही… स्वतःच्या पायावर उभी राहणार आहे… आणि हो…ज्ञमी अठरा वर्षांची आहे हे मला माहिती आहे… आणि म्हणूनच…"

तिचा आवाज अधिक ठाम होतो…
“तो उद्या लग्न करायला नाही… तर फक्त बोलणी करायला येतोय…”


क्रमशः....

©® प्राची कांबळे (मिनू)


"सदर दीर्घकथेचे भाग नियमित पोस्ट होणार असून याचे पुढील भाग चुकू नयेत म्हणून पेज फॉलो करा आणि फॉलो सेटिंग मध्ये जाऊन "fevorite" ऑप्शन निवडून घ्या जेणेकरून एकही भाग सुटणार नाही."